Mothers Day 2023: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दररोज काहीना काही व्हायरल होत असते. यातील काही व्हिडीओ खळबळ उडवून देणारे असतात. तर काही विडिओ प्रेरणा देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. पण, हा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे. हा विडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक हेयर स्टायलिस्ट तरुण एका महिलेचे केस कापताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ @guido.magalhaes या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत असलेला तरुण ब्राझीलचा असून तो पेशाने हेअर स्टायलिश आहे. ती महिला त्या तरुणाची आई आहे. त्याच्या आईला कॅन्सर झाला आहे. त्यामुळेच त्या आईला आपले केस कापावे लागत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता की, तो तरुण आपल्या आईचे केस कापत असताना आईला बरं वाटावं म्हणून स्वतःचेही केस कापायला सुरुवात करतो. हे पाहून आईला देखील अश्रू अनावर होतात.
https://www.instagram.com/p/Crt4BqEA30a/
आईला एकटं वाटू नये म्हणून त्या तरुणाने स्वतः चे केस कापले. इतकेच नव्हे तर आईला भावनिक आधार देण्यासाठी मुलासह त्याच्या मित्रानी देखील केस कापण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आईला नक्कीच असं वाटलं असेल की, या लढाईत मी एकटी नाहीये. कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधाराचाही तितकीच गरज असते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच मदर्स डेच्या दिवशी मुलाने आपल्या आईसाठी जे केलं आहे त्यावरून त्याचं कौतुक देखील केलं जात आहे.