बलकरला मोटारसायकलस्वाराची जबर धडक ; एक ठार

---Advertisement---

 

भुसावळ : तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. भुसावळकडून घरी परत पिंप्रीसेकम फाटा येथे जात असणाऱ्या एका मोटारसायकल चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बालकराल जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दामोदर शांताराम तायडे (वय. ६३) असे मयतांचे नाव आहे.


तालुक्यातील पिंप्रीसेकम फाटा, बोरोले लॉन जवळील रहिवासी दामोदर शांताराम तायडे हे मोटरसायकलने (क्रमांक एम.एच.१९ सी.ए. १०१४) ने रात्री आठ वाजेच्या दरम्यान भुसावळकडून घरी परतत होते. याचवेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पटेल टी सेंटर जवळील सर्व्हिस रस्त्यांच्या कडेला मोठे बलकर (क्रमांक एम.एच.०१ ए.जे २०७१) उभे होते. या उभ्या असलेल्या बालकरला दामोदर तायडे यांनी मागून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात (शनिवार २०) रोजी घडला.

घटनास्थळी पोउपनिरी मंगेश जाधव यांनी भेट देवून सदरील घटनेचा पंचनामा केला व मयत इसमास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरील बलकर ताब्यात घेण्यात आले असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी लावले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---