परराज्यातील मोटारसायकल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकले

---Advertisement---

 

भुसावळ : येथील रेल्वे स्टेशन जवळील एटीएम जवळून अझरुद्दीन निजामुद्दीन शेख (रा. किराणा दुकान गोसिया नगर भुसावळ) यांची हिरो होंडा कंपनीची लाल काळ रंगाची एचएफ डीलक्स (एमएच 11 बीव्ही 5886) ही गाडी चोरी गेल्यावरून बाजारपेठ स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आली. गाडीचा तपास करत असताना गोपीय बातमीदार मार्फत माहिती या मोटरसायकल चोरीबाबत खुलासा झाला.

गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल आरोपी काल्या उर्फ विक्रम केसर सिंग बारेला ( वय 20 रा. गारण्या तालुका जिरण्या जिल्हा खरगोन मध्य प्रदेश) हल्ली मुक्काम शहापूर जिल्हा बऱ्हाणपूर तपासामध्ये निष्पन्न झाले असता त्या शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले.

आरपीएफकडे चौकशी केली असता त्याच्या साथीदार राहुल रितेश चव्हाण (वय 18 एक नंबर वार्ड जय भीम मोहल्ला शहापूर जिल्हा बऱ्हाणपूर) यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. वरील चोरीस गेलेली मोटरसायकल ही चोरवड तालुका भुसावळ येथे हस्त करण्यात आली. तपास दरम्यान आरोपीना अटक केली असता त्यांनी आठ लाख 32 हजार रुपये किमतीच्या 16 मोटरसायकली चोरी केल्याचे कबुली दिली. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून 16 मोटरसायकली गाड्या जप्त करण्यात

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ संदीप गावीत, तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ विजय नेरकर, पो. ना. सोपान पाटील, पोकॉ योगेश माळी, पोकॉ भुषण चौधरी, पोकॉ प्रशांत सोनार, पोकॉ महेंद्रसींग पाटील, पोकॉ अमर अढाळे, पोहेकॉ किरण धनगर, पोहेकॉ रवींद्र भावसार, पोकॉ सचीन चौधरी, पोकॉ जावेद शहा, पोकॉ हर्षल महाजन, पोकॉ योगेश महाजन यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---