सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह ।१८ फेब्रुवारी २०२३। बॉलीवूड मधून एक वाईट बातमी समोर येतेय. आपल्या अभिनयाने ओटीटी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेता शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले. ५६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते शाहनवाज प्रधान  एका सत्कार समारंभाला गेले होते. या कार्यक्रमादरम्यान अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

शाहनवाज यांनी गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची भूमिका साकारल्यानंतर बरीच चर्चा होत होती. शाहनवाज प्रधान यांचा जन्म 6 डिसेंबर 1963 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शाळेत असतानाच शाहनवाज यांना अभिनयात रस होता. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना त्यांनी एक थिएटर ग्रुप देखील जॉईंट केला होता. शाहनवाज यांनी 1991 साली सिनेसृष्टीत करियर घडवायचं म्हणून मुंबई गाठली. जेव्हा आपल्या करियरची सुरुवात केली तेव्हा त्यांनी दुरदर्शनवरील शो श्री कृष्ण या मालिकेत नंदची भूमिका साकारली होती. ओटीटीवर सर्वाधिक चालणाऱ्या ‘मिर्झापूर १ आणि २’ या वेबसीरिजमध्येही त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांचा अकाली निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.