---Advertisement---

मराठी सिनेसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध अभिनेते ‘मिलिंद सफई’ यांचं निधन

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २६ ऑगस्ट २०२३। मराठी सिनेसृष्टीमधुन एक धक्कादायक बातमी समोर येतेय. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झाल. शुक्रवारी सकाळी १०.४५ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिलिंद सफई यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. अनेक मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली होती.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद सफई यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. अखेर त्यांची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज संपली. अनेक मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होत.  नुकतेच ते लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मध्येही दिसले होते. या मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मिलिंद सफई यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

मिलिंद सफई यांनी प्रेमाची गोष्ट, लकडाऊन, पोस्टर बॉईज अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तसेच गाजलेल्या पुढचं पाऊल या मालिकेतही ते महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---