तरुण भारत लाईव्ह । २२ फेब्रुवारी २०२३। दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुबी सुरेश या मल्याळम मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश मागच्या काही दिवासांपासून यकृतासंबंधित आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर कोची येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान सुबी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर त्या स्टेज शोमध्ये कॉमेडी करू लागल्या.
सुबी सुरेश या मल्याळम मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांची विनोदी शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. कॉमेडी शो आणि मालिकांमध्ये त्यांनी जास्त काम केलं आहे. ‘कुट्टी पट्टलम’ हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम. नाटकांसह त्या ‘गृहनाथन’, ‘एलसम्मा एन्ना आंकू’ या लोकप्रिय सिनेमांतदेखील झळकल्या आहेत.
सुबी यांच्या निधनानंतर त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीनने पोस्ट केली आहे की,”एका गोष्टीचा शेवट झाल्यानंतर नवीन गोष्टीची सुरुवात होत असते. पुन्हा भेटू…धन्यवाद”. या पोस्टवर मल्याळम सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसह चाहतेदेखील शोक व्यक्त करत आहेत.