तरुण भारत लाईव्ह । ३ सप्टेंबर २०२३। क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या कित्येक महिन्यांपासून हिथ स्ट्रीक हे कर्करोगाच्या आजाराशी झुंज देत होते. रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
हीथ स्ट्रीकची पत्नी नादिनने पतीच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहली आज पहाटे माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हा सर्वांना सोडून गेले. त्याला आपले शेवटचे दिवस आमच्यासोबत घालवायचे होते. अनंतकाळच्या प्रवासासाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू.
हीथने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2943 धावा आहेत. याशिवाय हीथने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आहेत.