पंजाबी संगीत क्षेत्रावर शोककळा; प्रसिद्ध गायक कंवर चहल यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह । ५ मे २०२३। पंजाबी संगीत क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत आपल्या आवाजाने लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची ताकद असलेले गायक कंवर चहल यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी कंवलने जगाचा निरोप घेतला.

कंवल चहलने अनेक लोकप्रिय गाणी गायली होती. त्याच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. कंवलने शहनाज गिलसोबतही काम केलं आहे. कंवलचं अचानक निधन झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि पंजाबी इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. संपूर्ण संगीत जगतात शोककळा पसरली आहे. कंवर चहलने शेहनाज गिल सोबत ‘माझे दी जट्टी’ मध्ये काम केले आहे. कंवर चहलचे पहिले गाणे ‘गल सून जा’ खूप गाजले.

‘गल सुन जा’ या गाण्याने त्याला ओळख मिळवून दिली होती. मोठ्या बहिणीकडून त्याने संगीताचे धडे गिरवले होते. ‘इक वार’, ‘डोर’ आणि ‘ब्रांड’साठी त्याने गाणी गायली होती. तो सोशल मीडिया इन्फ्लून्सर होता. आपल्या दैनंदिन घडामोडींबाबत आपल्या फॅन्सला माहिती द्यायला त्याला आवडायचे. त्यामुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होता.

कंवल चहल यांच्या निधनाने पंजाबची म्युझिक इंडस्ट्री दु:खात बुडाली आहे. कंवलच्या पार्थिवावर पंजाबच्या मनसाच्या भीखी येथे अंत्यसंस्कार केला जाणार आहे. यावेळी त्याच्या कुटुंबीयांसह त्याचा मित्र परिवार उपस्थित राहणार आहे. कंवल याच्या निधनाने पंजाबी इंडस्ट्रीला दुसरा धक्का बसला आहे. या आधी प्रसिद्ध गायक निरवैर सिंह यांचा अपघाती मृत्यू झाला. तर लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता अचानक कंवल चहल याचं निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र त्याचं निधन कशामुळे झालं याची माहिती मिळू शकली नाही.