MP Cabinet Expansion : सोमवारी मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव यांनी रविवारी रात्री माहिती दिली आहे. मोहन यादव यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शपथविधी होणार आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डबल इंजिन सरकारचा भाग म्हणून मध्य प्रदेशच्या विकासाची शपथ घेणार आहोत. याआधी मोहन यादव यांनी दोन दिवस दिल्लीत भाजपच्या सर्व नेत्यांची भेट घेतली.
#WATCH | Madhya Pradesh CM Mohan Yadav says, " Tomorrow at 3:30 pm Madhya Pradesh cabinet expansion will take place…under the leadership of PM Modi, Home Minister Amit Shah and BJP chief JP Nadda, we will come again as double engine govt" https://t.co/oCgfUFJmiP pic.twitter.com/IkBzORL2I5
— ANI (@ANI) December 24, 2023
मध्य प्रदेशाच्या यादव सरकारमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते, असं सूत्रांचा म्हणणं आहे. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात नव्या-जुन्या चेहऱ्यांमध्ये ताळमेळ राहील, असेही बोलला जात आहे. ज्यांना मंत्री केलं जाणार आहे, त्यांची नवे पक्षश्रेष्ठींनी निश्चित केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
मंत्रिमंडळात अनुभवी आणि नवीन नेत्यांचा समावेश असेल. मंत्रिमंडळात किमान 15-18 मंत्र्यांचा समावेश असेल. सध्या मंत्रिमंडळात फक्त तीन मंत्र्यांचा आहेत (मुख्यमंत्री मोहन यादव आणि दोन उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा)
मोहन यादव यांनी 13 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 22 डिसेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यादरम्यान विकास योजनांवरही चर्चा झाली.