MP Cabinet: मध्य प्रदेशमध्ये अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी २५ डिसेंबर रोजी पार पडला. राज्यपाल मंगू भाई पटेल यांनी मध्य प्रदेशच्या एकूण २८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. मोहन यादव यांच्या सरकारमध्ये १८ मंत्र्यांचा सामावेश झाला आहे. ६ आमदारांना राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) बनविण्यात आलं आहे. तर ४ आमदारांना राज्यमंत्री करण्यात आलं आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर आमदारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केल्याचाही दिसून आलं (Tarun Bharat live)
मध्य प्रदेशमधील सरकारच्या शपधविधी (MP Cabinet) कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेश भाजप प्रदेश वीडी शर्मा तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमासाठी राजभवनाच्या बाहेरही आमदारांचे समर्थकांनी एकच गर्दी केली होती.
मोहन यादव सरकारच्या मंत्रिमंडळात (ministers ) प्रदुम्न सिंह, तुलसी सिलावट, एदल सिंह कसाना, नारायण सिंह कुशवाहा,विजय शाह, राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, कैलास विजयवर्गीय, करण सिंह वर्मा , संपतिया उईके, उदय प्रताप सिंह, निर्मला भूरिया,विश्वास सारंग, गोविंद सिंह राजपूत , इंदर सिंह परमार, नागर सिंह चौहान, चैतन्य कश्यप, राकेश शुक्ला यांचा कॅबिनेटमध्ये सामावेश करण्यात आला आहे.
कृष्णा गौर, धर्मेंद्र लोधी, दिलीप जयस्वाल, गौतम टेटवाल, लेखन पटेल, नारायण पवार यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार) देण्यात आलं आहे. तसेच राधा सिंह, प्रतिमा बागरी, दिलीप अहिरवार,नरेंद्र शिवाजी पटेल यांनी राज्यमंत्री बनविण्यात आलं आहे. सर्वात आधी कैलास विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, राव उदय प्रताप सिंह यांनी शपथ घेतली.