अमळनेर : शहरात झालेल्या मुसळधार पावसाने भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्समधील भिंत अचानक पडली. यामुळे कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरून, बेसमेंटमधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले. खासदार स्मिता वाघ यांनी पाहणी करत, पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पालिकेच्या मुख्याधिकारी यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेली गटार तुंबत असल्याने पाण्याचा निचरा होण्यास जागा मिळत नाही. यामुळे जोरदार झालेल्या पावसाचे पाणी कॉम्प्लेक्सच्या संरक्षण भिंतीत मुरल्याने भली मोठी भिंत कोसळून संपूर्ण पाणी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट शिरले व तेथील सारी दुकाने जलमय होऊन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले ही बाब दुकानदारांनी स्मिता वाघांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी तातडीने पालिकेच्या मुख्याधिकारी तुषार नेरकर सदर गटार मोठी करून त्यात मोठा पाईप टाकण्याच्या सूचना केल्या,श्री नेरकर यांनी देखील लागलीच काम सुरू करण्याची ग्वाही खासदारांना दिली. दरम्यान घटनेच्या दिवशी परिस्थिती बिकट असताना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत रात्री साडे तीन वाजेपर्यंत पंप लावून पाणी काढल्याने स्मिता वाघांनी पालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.व ज्या व्यावसायिकांचे यात मोठे नुकसान झाले त्यांना धीर दिला.
यावेळी पाटील ऍग्रो चे प्रशांत पाटील,धवल ऑटो चे धवल शाह,जमिनी टेलर्स चे गुलाबराव पाटील,धनश्री सेल्स चे भरत जावदेकर,अक्षरा प्लायवूड चे रुपेश कोतवाल,हिंगलाज मसाज थेरपी सेंटरचे विजयकुमार ढवळे,बालाजी इलेक्ट्रिक चे धनराज बडगुजर यासह इतर व्यावसायिक तसेच भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख,माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस राकेश पाटील, देवा लांडगे, राहुल चौधरी, हिरालाल पाटील आदी उपस्थित होते.