---Advertisement---

MP Smita Wagh : खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश, शेतकऱ्यांनी मानले आभार

---Advertisement---

धरणगाव : पारोळा रस्त्यावरील गेट नंबर 142 वरील अंडर पासचे कार्य अनेक दिवसापासून बंद होते. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याकडे समस्या मांडली होती. दरम्यान, खासदार वाघ यांच्या प्रयत्नातर अखेर शेतकऱ्यांची समस्या दूर करण्यात आली.

गेट नंबर 142 वरील अंडर पास चे कार्य कित्येक दिवसापासून बंद होते. त्या साठी पारोळा रस्त्यावरील शेतकरी धरणगाव रेल्वे स्टेशन वर स्टेशन मास्टर श्री.सचिन भाकरे पाटील यांच्या कडे निवेदन दिले त्या वेळेस शेतकरी यांनी डी. आर. यू. सी. सी. महेंद्र कोठारी यांच्याशी फोनवर संपर्क केला.त्यांना समस्या विषयी चर्चा केली तेव्हा त्यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्याची समस्या सांगितली.

खासदार वाघ यांनी मुंबई सेंट्रल डिव्हिजन यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यान्ची समस्या दूर करून गेट नंबर 142 चे कार्य जोरात सुरु झाले तसेच बाजूच्या अंडर पास मधून तात्पुरता शेतकऱ्यांना पायी व मोटर सायकल ने, सायकलने ये जा करण्यासाठी व्यवस्था केल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग खासदार यांच्या कार्यावर खुश झाले व त्यानी ताईंना धन्यवाद दिलेत. यासाठी शेतकरी श्री.रघुनाथ कोळी, गोपालसिंग बयस, महेंद्र माळी, योगराज माळी, मोहन महाजन, दगा मराठे, विपीन तिवारी, शिवाजी माळी, मेहुल भाटिया, मोहम्मद खाटीक, ऍडव्होकेट सुकलाल शिंदे, बापू बडगुजर, भिकन आदी शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment