---Advertisement---
धरणगाव : येथील तालुका प्रवासी मंडळाच्या मागणीनुसार 3 हॉलिडे स्पेशलला धरणगाव साठी हॉल्ट देण्यात आलाय. जळगाव येथे खासदार स्मिता वाघ यांना त्यांच्या निवासस्थानी धरणगाव तालुका प्रवासी मंडळतर्फे 09129/30 बांद्रा टर्मिनस रेवा एक्स., 09025/26 बलसाड दानापूर एक्स. 09575/76 राजकोट महेबूब नगर एक्स. ला धरणगाव हाल्ट साठी दि.1 मार्च रोजी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून हा थांबा धरणगाव साठी मंजूर करून घेतला असून, त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे.
09129 बांद्रा टर्मिनस इथून प्रत्येक गुरुवारी सकाळी 4.30 वाजता निघून धरणगाव ला दुपारी 1.34 वाजता येऊन रेवा साठी रवाना होईल. तसेच 09130 रेवा हुन प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 वाजता निघून धरणगाव ला सकाळी 3.31 वाजता येऊन बांद्रा टर्मिनस साठी रवाना होईल.
09025 बलसाड दानापूर ही बल साड वरून प्रत्येक सोमवारी सकाळी 8.40 ला निघून धरणगाव ला दुपारी 1.34 वाजता येऊन दानापूर कडे रवाना होईल. तसेच 09026 दानापूर इथून प्रत्येक मंगळवारी दुपारी 2.30 वाजता निघून धरणगाव ला बुधवारी दुपारी 4.30 वाजता येऊन बलसाड कडे रवाना होईल.
09075 राजकोट महेबूब नगर एक्स. राजकोट हुन प्रत्येक सोमवारी दुपारी 1.45 वाजता निघून धरणगाव ला मंगळवारी सकाळी 3.42 वाजता येऊन महेबूब नगर साठी रवाना होईल. 09076 महेबूब नगर हुन प्रत्येक मंगळवारी रात्री 10.00 वाजता निघून धरणगावला बुधवारी दुपारी 4.42 वाजता येऊन राजकोट साठी रवाना होईल.
यासाठी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ व रेल्वे प्रशासनाचे धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष आभार मानले
या साठी डी. आर. यू. सी. सी मेंबर महेंद्र कोठारी रवींद्र भागवत एस.डब्लू. पाटील,डॉ. मिलिंद डहाळे, सुनील चौधरी, आनंद बाचपई, ललित येवले,किरण वाणी, हितेश पटेल, दिनकर पाटील, किरणसिह परिहार,संतोष सोनवणे,सुशील कोठारी,
बाबा कासार, सुदाम चौधरी यांनी प्रयत्न केले. तसेच धरणगाव तालुका प्रवासी मंडळचा वतीने आवाहन करण्यात आले वरील जलद गांड्याचा प्रवाश्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आला आहे.
---Advertisement---