MP Unmesh Patil : जनतेने दिलेल्या संधितून विकासाचा ध्येय साकारले !

धरणगाव :  २०१९ मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातील जनतेने संधी दिली देशातील पहिल्या दहा खासदार चे मतधिक्यात माझे नाव आले आता खासदार यांच्या कामाचे मूल्यमापन झाले या कामगिरीत देखील पहिल्या दहा खासदार मध्ये माझे नाव आहे.जनतेच्या आशीर्वादाने सर्वाधिक निधी विकास कामांसाठी वापरून अनेक लहान मोठे विकासाची कामे मतदार संघात केलेली आहेत असे मत खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.

ते धरणगाव येथे अमृत योजने अंतर्गत रेल्वे स्थानक पुनर्विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कामाचे भूमिपूजन ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला रेल्वेचे ए डी आर एम सुनील तिवारी, एडीएम श्री अग्निहोत्री,प्रमोद ठाकूर, जळगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नफापे, स्टेशन मास्टर निशिकांत ठाकूर, पंकज पांडे, रेल्वे पोलिस चे ए सी आय जयपाल सिंग,
जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील ,सामाजिक समरसता म्हणजे प्रा रमेश महाजन, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डीजी पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, एडवोकेट संजय महाजन, गटनेते पप्पू भावे,विलास महाजन, शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील, जि प सदस्य माधुरी उत्तरदे ,भाजपचे पी.सी पाटील,हेडगेवार नगर ग्रामपंचायत उपसरपंच चंदन पाटील, एडवोकेट वसंतराव भोलाणे ,दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , मुख्याध्यापक डॉ संजीव कुमार सोनवणे, कैलास माळी आदी उपस्थित होते.

यावेळी पी आर हायस्कूल, गुरुकुल इंग्लिश मीडियम, लिटल ब्लॉसम , अँग्लो उर्दू आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत शिवाय या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासनामार्फत आयोजित निबंध ,चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वाटप यावेळी करण्यात आले. प्रतीक जैन यांनी रेल्वे स्थानकात काय विकास होणार या संदर्भात सविस्तर माहिती दिली,प्रताप राव पाटील, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले स्क्रीन वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन उपस्थितांना भावले.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतीक जैन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण वाणी, श्री बाचपाई यांच्यासह भुसावळ, जळगाव, धरणगाव,अमळनेर रेल्वे प्रशासन, धरणगाव रेल्वे सल्लागार मंडळ ,धरणगाव रेल्वे प्रवासी मंडळ आदींनी परिश्रम घेतले.

–  अमृत भारत स्टेशन या योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या इमारती मध्ये सुधारणा, स्थानकाबाहेर गार्डन, दिव्यांगांसाठी सुविधा, लिफ्ट, किरकोळ विक्रीसाठी जागा ,कॅपिटेरिया, वेटिंग रूम ,स्वतंत्र आगमन निगमन गेट , इंडिकेटर,पार्किंग व्यवस्था असे अनेक प्रकारच्या सुविधा होणार आहेत. धरणगाव स्थानक विकसासाठी २७ कोटी रुपये ची तरदुत आहे.
–  यावेळी धरणगाव मार्गे पुण्यासाठी गाडी ,पुरी अजमेर एक्सप्रेस थांबा, मुंबई साठी नव्याने गाडी अशा मागण्या करण्यात आल्यात.