---Advertisement---

MPSC परीक्षेत जळगावची मनीषा उत्तीर्ण

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल (२०२२) बुधवार, २० रोजी सायंकाळी जाहीर झाला आहे. यामध्ये जळगाव येथील मनीषा रवींद्र मोराणकर ही उत्तीर्ण झाली आहे. मनीषाच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

तिला निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था (Inspector Certified School and Institution) हे ग्रुप बी चे पद मिळाले आहे. जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र माधव मोराणकर यांची ती कन्या आहे. याआधी मनीषाचा भाऊ जीवन रवींद्र मोराणकर हादेखील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. सध्या तो नांदुरा, जि. बुलढाणा येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून कार्यरत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment