MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयोगाने याबाबत संकेतस्थळावरुन वेळापत्रक शेअर केलं आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आज पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी MPSCचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ साठीच्या मुलाखती नियोजित केल्या आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या २३ आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात मुलाखती घेण्यात येणार होत्या मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.