MPSC : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक

पुणेः राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC) २०२५पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. ती मागणी नुकतीच मान्य झाली आहे. मात्र पुन्हा पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये उद्या हे विद्यार्थी उपोषणाला बसणार आहेत. सरकार जाणून-बुजून आम्हाला त्रास देत असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आणि सरकारला दिला आहे.

आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण ९ पेपर असतील.

  • त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी ३०० गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील.
  • याशिवाय मुलाखतीसाठी २७५गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५ असतील.
  • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.
  • सोबतच एकूण २४ विषयांतून उमेदवारांना १ वैकल्पिक विषय निवडता येईल.