नवी दिल्ली । देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) मंजूर केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
विशेष म्हणजे यामध्ये कापसाच्या पिकापासून, मूंग डाळ, उडिदाची डाळ, शेगदाणे, मक्का यांचादेखील समावेश आहे. केंद्रीय सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. एमएसपीमध्ये धानाच्या भावात प्रति क्विंटल 117 रुपये, मूगाच्या दरात 124 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. कापसासाठी एमएसपी 7121 रुपये निश्चित करण्यात आला असून त्यात 501 रुपयांची वाढ झाली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दोन लाख नवीन गोदामे बांधली जात आहेत. सरकार शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करत अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात शेतकरी कल्याणाला प्राधान्य दिले जाईल. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी 14 पिकांच्या एमएसपीला मंजुरी दिली आहे, जो किमतीच्या किमान 1.5 पट जास्त असावा.
रकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. ज्वारी, भात, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आणि तीळ यांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आता पिकांचा हमीभाव वाढवा, नवा दर काय?
ज्वारी- 3,371 रुपये प्रति क्विंटल
नाचणी- 2,490 रुपये प्रति क्विंटल
बाजरी- 2,625 रुपये प्रति क्विंटल
मक्का- 2,225 रुपये प्रति क्विंटल
मूग- 8,682 रुपये प्रति क्विंटल
तूर- 7,550 रुपये प्रति क्विंटल
उडीद- 7,400 रुपये प्रति क्विंटल
तीळ- 9,267 रुपये प्रति क्विंटल
भुईमूग- 6,783 रुपये प्रति क्विंटल
रेपीसीड- 8,717 रुपये प्रति क्विंटल
सूर्यफूल- 7,280 रुपये प्रति क्विंटल
सोयाबीन- 4,892 रुपये प्रति क्विंटल