Festival : देशात अनेक उत्सव साजरा होत असतात, असाच एक अनोखा उत्सव नाशिकमध्ये नुकताच पार पडला. या उत्सवामध्ये अधिकारी, राजकीय नेते, उद्योजक सहभागी होत आनंद घेतला. या उत्सवाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
शहरात सालाबादाप्रमाणे यंदाही चामरलेण्यांच्या पायथ्याशी मडबाथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. याला मातीने स्नान म्हणूनही संबोधले जाते. हजारो नागरिक यामध्ये सहभागी झाले. २५ फुट लांबीचा टब यावेळेला तयार करण्यात आला. त्यामध्ये एकमेकांच्या अंगाला चिखल लावण्यात आला. त्यानंतर उन्हात वाळत उभे राहिले. संपूर्ण चिखल वाळल्यानंतर शॉवर खाली उभे राहिले यावेळेला डीजेही लावण्यात आल्याने नागरिकांनी ठेका धरला.
महिनाभर अगोदरच या उत्सवाची तयारी सुरु होत असते. उन्हाळ्यात या उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये जी माती वापरली जाते ती वारुळाची माती वापरली जाते. आठ दिवस ही माती पाणयात भिजवली जाते आणि त्यानंतर वापरली जाते.