‘मुघल गार्डन’चे केले नामकरण, जाणून घ्या काय आहे नवं नाव

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। राष्ट्रपती भवनाच्या आत बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुघल गार्डनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने मुघल गार्डनचे नाव बदलले आहे. मुघल गार्डन आता ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखण्यात येईल.

या भागात राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या उद्यानाला अमृत उद्यान असे नाव दिले आहे. अमृत उद्यानमध्ये १३८ प्रकारचे गुलाब, १० हजार पेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि ७० विविध प्रजातींच्या सुमारे ५ हजार हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. १५ एक्कर परीसरात पसरलेल्या मुगल गार्डन या उद्यानाची निर्मीती ब्रिटिश काळात झाली होती. हे गार्डन राष्ट्रपती भवनाचा आत्मा असल्याची कथा आहे. मुघल गार्डन्सचा एक भाग गुलाबांच्या विशेष प्रकारांसाठी ओळखला जातो. राष्ट्रपती भवन आणि मुघल गार्डन्सची रचना इंग्रज वास्तुविशारद सर एडवर्ड लुटियंस यांनी केली होती.

राष्ट्रपतींचे माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांच्या माहितीनुसार उद्यानात येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी आता सर्व सर्व वनस्पती व झाडांजवळ क्यू आर कोड लावण्यात येईल. तसेच २० मार्गदर्शक येथे काम करतील. ते झाडे आणि वनस्पतींची माहिती देतील.