नंदुरबार : २५ वर्षानंतर देखील असंख्य अडचणींनी नंदुरबार जिल्हा घेरलेला आहे. जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असून, देखील मागासलेपणाची ओळख व परिस्थिती बदलण्यासाठी अस्मितेच्या विषय व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याच्या लोक विकासाची चळवळ उभी रहावी यासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम तर्फे मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवार (दि.७) रोजी दुपारी २ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री, आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री,आ.ॲड के.सी पाडवी,आ.राजेश पाडवी,आ.शिरीषकुमार नाईक,माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी,भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,माजी आ.उदेसिंग पाडवी,राष्ट्रवादीचे (अजित पवार गट)जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे,सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील,जि.प सदस्य विजय पराडके, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, जि.प माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल,तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी उपस्थित राहणार आहेत.
उपस्थित राहण्याची विनंती शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचे समन्वयक अभिजीत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित,जि.प सदस्य ॲड.राम रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी केली आहे.