मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांच्या सोबत धाकटा मुलगा अनंत अंबानी व होणारी सुन राधिका मर्चंट देखील उपस्थित होते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिका यांचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रतिष्ठित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. या निमित्ताने अंबानी कुटुंबियाने एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले.
बीकेसी येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मुंबईत एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. पारंपारिक हिंदू वैदिक रितीरिवाजानुसार विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा सोहळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ असेल असे सांगितले जात आहे.
शुक्रवारी १२ जुलै रोजी लग्नसोहळा होणार आहे. त्या दिवशी सर्व निमंत्रितांना पारंपारिक भारतीय पोशाखात येण्याचे निमंत्रण आहे, शनिवारी, १३ जुलै रोजीही उत्सव सुरुच राहणार आहे. तर रविवारी १४ जुलै रोजी या नियोजित सोहळ्याची सांगता होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी पाहुण्यांना ‘भारतातील विविधता’ दर्शवणारा ड्रेस कोड असणार आहे, असे सांगितले जात आहेत.
#WATCH | Mumbai: Reliance Industries Chairman Mukesh Ambani along with his son Anant Ambani and Radhika Merchant met Maharashtra CM Eknath Shinde and extended the invitation for the wedding of Anant Ambani and Radhika Merchant, scheduled on July 12. pic.twitter.com/BpG0WVBjy3
— ANI (@ANI) June 26, 2024