---Advertisement---
जळगाव : पत्नीला घेण्यासाठी गेलेले देवानंद साहेबराव वाघ (वय २९, रा. नांदवेल, ता. मुक्ताईनगर) यांना कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.
ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी श्रीकृष्ण कॉलनीत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवानंद वाघ हे पत्नीला घेण्यासाठी गेले असता त्यांचे मामेसासरे कृष्णा भिला सोनवणे व त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्याने शिवीगाळ करीत मारहाण केली.
बंद घरात चोरट्यांनी केला हात साफ
जळगाव : आत्याच्या घरी गेलेल्या प्राजक्ता संजय तायडे (२८, रा. बिबा नगर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी रोकडसह सोने चांदीचे दागिने असा एकूण ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. चोरटे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राजक्ता तायडे या त्याच परिसरात राहणाऱ्या त्यांच्या आत्याकडे गेल्या असताना चोरट्यांनी रोख १९ हजार रुपयांसह ६० हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची सोन्याची चेन, तसेच तीन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे कड़े असे एकूण ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.