मुंबई । मागील गेल्या काही काळात शेअर बाजारात मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. काही शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना इतके श्रीमंत केले आहे की केवळ 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले आहे.
होय, त्या शेअरचे नाव Alkyl Amines Chemicals Limited असं आहे. या शेअरने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या एका दशकात या शेअरची किंमत 7,500 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये काही वर्षांपूर्वी 10,000 रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक आजपर्यंत तशीच ठेवली असेल, तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 7 लाख रुपये झाले असते.
अशा प्रकारे रिटर्न्स सातत्याने मिळत आहेत
या शेअरने अल्पावधीतही आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षांत त्याची किंमत 366 टक्क्यांनी वाढली आहे, तर गेल्या पाच वर्षांत ती 878 टक्क्यांनी वाढली आहे. शुक्रवारी, अल्काइल अमाइन्स केमिकल्सचा शेअर NSE वर 1.15 टक्क्यांनी किंवा 28.45 रुपयांनी घसरून 2,441.35 रुपयांवर बंद झाला.
कंपनी BSE 500 चा भाग आहे
ही BSE 500 कंपनी आहे, ज्याचे बाजार भांडवल सध्या सुमारे 12,480 कोटी रुपये आहे. याचा अर्थ ती सध्या BSE वर सूचीबद्ध असलेल्या सर्वात मोठ्या 500 कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी अमाइन आणि अमाइन आधारित रसायने बनवते आणि फार्मास्युटिकल, अॅग्रो केमिकल, रबर केमिकल, वॉटर ट्रीटमेंट इंडस्ट्री इत्यादींना रसायनांचा पुरवठा करते.
(टीप : येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या तज्ञांचा सल्ला घ्या)