मुंबई स्टाईल पावभाजी; नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह । २३ मार्च २०२३ । पावभाजी ही सर्वानाच आवडते. आपण बाहेर फिरायला गेलो तर पावभाजी आवर्जून खात असतो. तसं पण पावभाजी मध्ये अनेक प्रकारच्या भाज्या असतात त्यामुळे पावभाजी ही हेल्दी डिश आहे असं म्हणायला हरकत नाही. पावभाजी घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पी आहे. पावभाजी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
1 टेस्पून + 1 टेस्पून लोणी, ३ टॅमोटो, 1 वाटी  मटर, शिमला मिरची,  2 बटाटा, उकडलेले आणि मॅश करून, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून + ¼ टीस्पून कश्मिरी लाल तिखट / लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद / हळदी, १ टीस्पून + ½ टीस्पून पाव भाजी मसाला, १ चमचा + १ चमचा कसुरी मेथी / कोरडी मेथीची पाने, २ चमचे + १ टेस्पून धणे पाने( कोशमबीर), बारीक चिरून घ्यावी, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ कांदा, बारीक चिरून, ½ लिंबाचा रस, 3 थेंब लाल फूड रंग, पर्यायी, आवश्यकतेनुसार पाणी

कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या कढईत 1 टेस्पून बटर गरम करून त्यात सर्व भाज्या घाला. त्या चांगल्या शिजवून घ्या आणि नंतर मिक्सर मध्ये मॅश करा. आता चांगल्या मॅश झाल्या की कढईत बटर घाला गरम झालं की त्यात मॅश केलेल्या भाज्या घाला .आता त्यात १ टीस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, १ टीस्पून पाव भाजी मसाला, १ चमचा कसुरी मेथी आणि २ चमचे कोथिंबीर घालावी. १ टेस्पून धणे पाने, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ कांदा आणि ½ लिंबाचा रस घाला. चांगले परता. आता रेड फूड कलरचे 3 थेंब घाला आणि चांगले मिक्स करावे. आता आपली पावभाजी तयार आहे आता तुम्ही पॅन वर लोणी किंवा बटर लावून पावभाजून घ्या. आता आपली पावभाजी रेसिपी तयार आहे .गरमागरम पावभाजी सर्व्ह करताना बारीक चिरलेला कांदा आणि कोथमबीर नक्की त्यावर टाका आणि मुंबई पद्धतीच्या पाव भाजी चा घरच्या घरी आनंद घ्या.