---Advertisement---
जळगाव : शहरातील २० ते २५ संस्थांनी आत्तापर्यंत मालमत्ता कर भरला नसल्याची तक्रार ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाने संबंधित संस्थांकडून मालमत्ता कराची वसुली केली जाणार असून १ कोटी ३७ लाख ४० हजार ४७५ रूपये मनपा तिजोरीत जमा होणार आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजे छत्रपती शाहू म हाराज रुग्णालय जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीची जागा दी जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे अध्यक्ष प्रकाश बाबुलाल चौबे यांना सन २०१६ मध्ये हॉस्पिटल चालवण्यासाठी दिलेली होती. मात्र महानगरपालिकेने या ठिकाणी घरपट्टी आकारलेली नव्हती.
---Advertisement---
माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी म.न.पा हितास्तव प्रशासक यांना वारंवार पत्र देऊन विषय लक्षात आणून दिला आणि म हानगरपालिकेने सन १६/१७ ते २५/२६ यामधील घरपट्टी ही सुम ारे ८४ लाख ६७ हजार ९०५ रुपये भरण्यासंदर्भात घरपट्टीची मालमत्ता देयक २५ / २६ या वर्षापासून संस्थेला पाठविली. तसेच सदर संस्थेला महानगरपालिकेची शाळा क्रमांक ३ पांजरापोळ चौक येथील शाळा चालवण्यासाठी देण्यात आलेली होती. संस्थेने करारनाम्याप्रमाणे वार्षिक दराने ठरलेली रक्कम ३ लाख ७८ हजार ९१५ रूयपे प्रति वर्षाप्रमाणे गेल्या ९ वर्षांपासून ती देखिल भरलेली नसल्याचे नाईक यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या संदर्भात महानगरपालिकेने ३३ लाख ६९ हजार ७५९ रुपये भाडेकरारनाम्याचे भरण्याबाबत नोटीस बजवलेली आहे, आणि घरपट्टीची रक्कम वार्षिक सन १६/१७ पासून १ लाख ७० हजार ५११ प्रमाणे १५ लाख ३४ हजार ६०५ रुपये दंड ३ लाख ६८ हजार ३०५ असे एकूण १९ लाख २० हजार ९१० रूपये एकूण रक्कम ५२ लाख ७२ हजार ७७० रुपये भरण्याबाबत आदेश सदर संस्थेला दिलेले आहेत.
आजच्या स्थितीत संस्थेकडे महानगरपालिकेचे १ कोटी ३७ लाख ४० हजार ४७५ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत. शहरातील २० ते २५ संस्था रडारवर असून त्यांनी आतापर्यंत महापालिकेला करापोटी एक रुपयाही कर भरलेला नाही. लवकरच त्यांच्याकडूनही वसूली होणार असल्याचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सांगितले.