नगरपरिषदेचा उदासीन कारभार : वारंवार पाठपुरावा करुन देखील नशिराबादमधील रस्त्यांची दुर्दशा कायम

---Advertisement---

 

नशिराबाद : 32 वर्षांपूर्वी द्वारका नगर हे एन ए झाले आहे, परंतु आजदेखील गट नंबर ६/१पर्यंत रस्ता तयार करण्यात आलेला नाही. दरवर्षी, पावसाळ्यामध्ये या रस्त्याची दुर्दशा होत असते. या रस्त्यावरुन जेष्ठ नागरिकांना चालणे सुद्धा अवघड होत आहे. तरी हा रस्ता त्वरित तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खराब रस्त्यांबाबत वारंवार निवेदन पत्र व्यवहार करून सुद्धा नगर परिषदेने कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु, प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यावर चिखल असल्यामुळे कचरा गाडीला घरोघरी जाणे आवघड झाले आहे. द्वारका नगरमधील इतर सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण झालेले आहे. रामदेवजी बाबा मंदिराकडील पूर्वे कडील व दक्षिणेकडील रस्ता आतापर्यंत नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.

स्थानिक रहिवाशी अनिल पाटील यांनी समस्या मांडतांना सांगितले की, या भागांमध्ये अतिक्रमण सुद्धा भरपूर झालेले आहे. त्याचबरोबर गुराढोरांच्या गोठ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तरी नगर परिषदेने यावर योग्य ती कारवाई करावी

माजी सैनिक लक्ष्मण राऊत यांनी सांगितले की अनेक वेळा या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही सर्व नागरिकांनी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे. परंतु, नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

मनोज पाटील यांनी स्पष्ट केले की, नगरपरिषदेने लवकरात लवकर हा रस्ता कॉम्रेटीकरण करून सहकार्य करावे. रहिवासी भागामध्ये वयोवृद्ध व्यक्ती लहान मुले आहेत त्यांचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विजय पाटील यांनी सांगितले की, रस्त्याची दुरावस्था झाली आहे, यामुळे घराच्या बाहेर निघणे सुद्धा कठीण झाले आहे. तरी नगर परिषदेने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून रस्ता तयार करावा

नशिराबादतील महात्मा फुले नगर व प्लॉट एरिया परिसरातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत,. महात्मा फुले नगर, परिसरातील भागात मूलभूत सोयीसुविधांसाठी वंचित आहे. अनेक भागांमध्ये विकास कामे झालेली नाहीत. अनेक नागरिकांनी नगरपालिकेच्या आणि स्थानिक प्रतिनिधींच्या, विशेषत: त्यांच्या खोलगट भागात येण्याजोग्या पायवाटांच्या अभावावर संताप व्यक्त केला आहे.

लोकप्रतिनिधी व नगरपालिकेचे अधिकारी त्यांच्या स्वतः या भागात येऊन रस्त्यांच्या दुष्टीची जाणीव करून दिली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शहर अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी यासंदर्भात निवेदन दिले होते. नगरपरिषदेने निवेदनाला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---