---Advertisement---

Municipal elections : सर्वांचं लक्ष लागलंय, चंद्रकांत पाटलांनी महिनाच सांगितला

---Advertisement---

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणूका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकीय नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या प्रशासक भरोसे चालला आहे. राजकारण्यांकडूनही या निवडणुकांबाबतची कोणतीच माहिती दिली जात नाहीये. मात्र, आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

एवढंच नव्हे तर या निवडणुका कोणत्या महिन्यात होऊ शकतात याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यंदाचं होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील? असा सवाल करण्यात आला. त्यावर आज त्याबाबत सुनावणी आहे. पण मला अजूनही वाटतं की या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच्याच वर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment