कौटुंबिक वादातून भुसावळात खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात

---Advertisement---

 

भुसावळ : शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. काल शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आयन कॉलनी परिसरात हे हत्याकांड घडून आले. यात एका तरुणाचा खून तर एक जण जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून खुनामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मयताचे नाव समद इस्माईल कुरेशी (वय ३५) असे आहे.

शहरातील आयान कॉलनी भागातील रहिवाशी सुभान शेख व त्यांची पत्नी यांच्यामध्ये दुपारी कौटुंबिक वाद उफाळून आले. या वादात नंतर शेख यांची पत्नी दुपारी ही जळगाव येथील मामाकडे गेली. वडील व मामा हे जावाईच्या घरी समजूत काढण्यासाठी आले असता जावायाने मामा समद शेख इस्माईल कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला चढविला यात घटनेत मामाचा मृत्यू झाला आहे. तर वडिल शेख जमिल शेख शकुर यांना मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी शेख जमिल शेख शकुर यांची रुग्णालयात भेट घेवून घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. शुभान शेख यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांची पत्नी सोबत नेहमी कौटुंबिक वाद व्हायचे. वाद झाले की, ती माहेरी कंडारी येथे निघून जायची व परत यायची. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी दुपारी दोघे पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला. या वादानंतर ती मामाकडे निघून गेली. जावाई यांची समजूत काढण्यासाठी मुलीचे मामा व वडील हे भुसावळला आले. मात्र, जावाई याने सासरे शेख जमिल शेख शकुर यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. तर मामा समद शेख इस्माईल यांना चाकूने छातीवर वार करीत जखमी केले. त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमध्ये पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले आहे.

यांनी दिली घटनास्थळी भेट

घटनास्थळी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षण राजू सांगळे, पोउप निरी. मंगेश जाधव तसेच गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांची धाव घेतली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---