---Advertisement---

भुसावळात विवाहित महिलेचा खून, संशयित आरोपी पतीला मनमाडमधून अटक?

---Advertisement---

भुसावळ । भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीच्या डोक्यात रॉडसदृश वस्तू मारून तिचा खून केल्याची घटना द्वारका नगरात घडली आहे. वर्षा अजय गुंजाळ (वय २५) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून पसार होण्याच्या प्रयत्नातील संशयित आरोपी पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. अक्षय आप्पासाहेब गुंजाळ (वय २६,रा. मुंबई) असं संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

याबाबत असे की, वर्षा अक्षय गुंजाळ ह्या द्वारकानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मागे त्यांच्या आजीकडे तात्पुरत्या रहिवासी म्हणून आलेल्या होत्या. मंगळवारी वर्षा गुंजाळ या घरी होत्या. त्यानंतर दुपारी वर्षा गुंजाळ यांच्या डोक्यात रॉडसदृश वस्तूने वार करून त्यांचा खून करण्यात आला. पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीनेच पत्नीचा खून केल्याची प्रथम दर्शनी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

या प्रकरणी मयत महिलेचे पती अक्षय आप्पासाहेब गुंजाळ यांचे त्यांच्या पत्नीशी तिच्या आजी रंजना प्रकाश यशोदे यांच्या घरी वास्तव्यास असताना जोरदार कौटुंबिक वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर पसार होण्याच्या प्रयत्नातील संशयित आरोपी पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा पुढील तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment