---Advertisement---

खळबळजनक ;  दोन चिमुकल्यांची गळा चिरून हत्या, आरोपी साजिदचे एन्काऊंटर

---Advertisement---

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये आयूष (१२) आणि त्याचा लहान भाऊ आहान उर्फ हनी (८) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. मुलांच्या हत्येनंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. साजिद (२५ )असं या आरोपीचं नाव आहे. घटना घडल्यानंतर आरोपीचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एक केशकर्तनालय चालवितो. मंगळवारी संध्याकाळी बदायूतील मंडई चौकीपासून काही अंतरावर असलेल्या बाबा कॉलनीत एका घराच्या छतावर तीन लहान मुले खेळत होती. यावेळी आरोपीने घरात घुसून या मुलांवर हल्ला केला. यावेळी आरोपीने आयूष (१२) आणि त्याचा लहान भाऊ आहान उर्फ हनी (८) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. तसेच त्यांच्याबरोबर खेळ असलेला आणखी मुलगा पियूषवरही (७) त्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला.

या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. बदायूचे पोलीस अधिक्षक आलोक प्रियदर्शनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी साजिदने घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळातच तो जवळच्या एका जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी याठिकाणी पोहोचत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. या एन्काऊंटरमध्ये आरोपीचा मृत्यू झाला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment