Brutal murder of youth in Mohadi : Accused arrested from Aurangabad धुळे : धुळे तालुक्यातील मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवधान शिवारात सतीश बापू मिस्तरी (30, नित्यानंद सोसायटी, मोहाडी उपनगर) या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. धुळे गुन्हे शाखा व मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्येचा उलगडा केला असून चेतन प्रताप गुजराथी (21, दंडेवाले बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) यास संभाजीनगर येथून अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान, मयताने आरोपीच्या बहिणीची छेडखानी केल्याने त्यातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहा.निरीक्षक भूषण कोते, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, हेमंत राऊत, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, श्रीशैल जाधव, सुनील पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन तसेच मोहाडी पोलिस ठाण्याचे शाम निकम, किरण कोठावदे, बी.एस.माळी, जे.ए.चौधरी, जे.सी.वाघ, एम.एन.मोरे, डी.जी.गवते, आर.व्ही.गुंजाळ, एम.एस.जाधव, बी.बी.पाटील, चालक जयेश पाटील व चेतन माळी यांच्या पथकाने उघडकीस आणला.