---Advertisement---

Kekat Nimbhora News : आजपासून संगीतमय भागवत कथा, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह

---Advertisement---

केकत निंभोरे, ता. जामनेर : येथे दरवर्षी रामनवमी ते हनुमान जयंती या सप्ताहात संगीतमय भागवत कथा व हरिनाम कीर्तन आयोजित केले जाते. त्यानुसार यंदाही ६ ते १३ एप्रिल दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळासुद्धा आयोजित केला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह हनुमान मंदिरासमोर हा सप्ताह होईल.

येथीलच मूळ रहिवासी वै. हभप प्रकाश महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने व वै. हभप विठ्ठल महाराज चौधरी यांच्या आशीर्वादाने १९९४ साली सप्ताहाला सुरुवात झाली. या वर्षी मलकापूर येथील हभप नितीनदास महाराज दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत भागवत कथा सांगतील. सकाळी सात ते बारा या वेळेत कळमसरा येथील हभप कल्पेश महाराज हे ज्ञानेश्वरी पारायण करतील. साथीला हभप ऋषिकेश महाराज व हभप हरीश महाराज असणार आहेत. दररोज सकाळी ५ ते ६ काकडा भजन, ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ५ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ५ ते६ हरिपाठ व रात्री ८:३० ते १०:३० हरिनाम कीर्तन असणार आहे.

६ एप्रिल रोजी जळकेकर हभप ज्ञानेश्वर महाराज, ७ एप्रिल रोजी सासवड येथील हभप विठ्ठल महाराज धोंडे, ८ रोजी मुक्ताईनगर येथील हभप रवींद्र हरणे महाराज, ९ रोजी त्रंबकेश्वर येथील हभप जयवंत गोसावी महाराज, १० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील नामदेव महाराजांचे वंशज हभप केशवदास नामदास महाराज, ११ रोजी पैठण येथील एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज गोसावी महाराज, १२ रोजी आळंदी संस्थांमधील हभप भावार्थ देखणे महाराज, १३ रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत तुकोबारायांचे वंशज हभप बाळासाहेब मोरे महाराज पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन होईल.

या सप्ताहात विविध प्रसंग दाखवले जाणार आहेत. १२ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ दिंडी सोहळा, १३ रोजी सकाळी ८.३० ते १०.३० काल्याचे कीर्तन, महाप्रसाद दुपारी १२ ते ४ यावेळेत भागवत दौलत भोंडे यांच्यातर्फे देण्यात येईल. या सप्ताहाचे व्यवस्थापन भजनी मंडळ व ग्रामस्थ हे करणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment