मुस्लिम तांत्रिक, अल्पवयीन मुलीला अर्ध्या रात्री बोलावलं अन्; गावात खळबळ

#image_title

एका मुस्लिम तांत्रिकाने 17 वर्षीय मुलीला तंत्र-मंत्राच्या बहाण्याने अर्ध्या रात्री बोलावून तिला पळवून नेल्याची फरार  खळबळजनक घटना समोर आली आहे. या तांत्रिकावर आधीपासून अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो सहा मुलांचा पिता असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : 36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण… 

गावात संतापाची लाट

गावकऱ्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते प्रताप सिंह यांनी काही गावकऱ्यांना घेऊन एसपी कार्यालयात जाऊन या प्रकरणात तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना 24 तासांच्या आत मुलीचा शोध लावण्याचा अल्टीमेटम दिला असून, अन्यथा महापंचायत बोलावून आर-पारच्या लढाईची घोषणा करण्याचा इशारा दिला आहे.

गुरुवारी रात्री तांत्रिकाने मुलीला तंत्र-मंत्राच्या नावाखाली बोलावले आणि फसवून पळवून नेले. यावेळी मुलीने घरातून लाखो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन निघाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली असून, ते तांत्रिकासोबत कृत्यात सहभागी असल्याचे सांगितले आहे. मात्र, मुख्य आरोपी तांत्रिक अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती दिली आहे.

भाजप नेत्यांचा इशारा

“तांत्रिकाला ताब्यात घेऊन मुलीला सुखरूप परत आणले नाही, तर आम्ही गावात महापंचायत बोलावून मोठा लढा उभारू,” असा इशारा भाजप नेते प्रताप सिंह यांनी दिला आहे.

प्रकरणात धक्कादायक खुलास्यांची शक्यता

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील किठौर क्षेत्रातील हे प्रकरण असून, या प्रकरण्रात तपासादरम्यान अजून काही गंभीर माहिती समोर येऊ शकते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून ग्रामस्थ आणि नेत्यांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.