‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराचा स्टेटस ठेवला, मुस्लिम युवकांचा तरुणावर हल्ला, घरावर दगडफेक काचाही फोडल्या!

बीड : औरंगाबादचे नामांतर होऊन आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजरी देण्यात आली. या निर्णयाचे राज्यभरात स्वागत करण्यात आले. मात्र छत्रपती संभाजीनगर नामांतराचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे एका तरुणावर 20 ते 25 मुस्लिम युवकांनी घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात ही घटना घडली आहे. सिरसाळा येथील रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर नावाचे व्हाट्सअप स्टेटस आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवले होते. हे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गायकवाड यांच्या घरावर ओळखीच्या 13 आणि अज्ञात 10 ते 15 लोकांनी हल्ला केला.

या हल्ल्यात गायकवाड यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची तोडफोडही करण्यात आली. याप्रकरणी रुपेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बीडच्या सिरसाळा पोलीसांत आरोपींविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.