नवी दिल्ली : इतर अनेक देशांच्या तुलनेत भारत हा मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक बांधवांसाठी उत्तम देश असून त्यांना कोणतीही बंधने या देशात लादली जात नाही, असे कौतुक जागतिक अहवालात करण्यात आले आहे. सेंटर फॉर पॉलिसी नालिसिस या संशोधन संस्थेने अनेक देशांतील धार्मिक अल्पसंख्याकांशी संबंधित एक अहवाल तयार केला. त्यात धार्मिक अल्पसंख्याकांचा सहभाग आणि त्यांना वागणूक देण्याबाबत भारताला सर्व देशांच्या यादीत अग्रस्थान देण्यात आले आहे.
भारतील मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्यांक सुरक्षित नसल्याचा कांगावा ठराविक मंडळींकडून नेहमीच केला जातो. काहींच्या स्वार्थी भुमिकेमुळे देशातील शांतातेला बाधा पोहचते. मात्र प्रत्यक्षात भारतातील अल्पसंख्याक समाज सर्वाधिक सुरक्षित आहे. यावर आता जागतिक मोहर देखील लागली आहे. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक अहवालात भारतील अल्पसंख्यांक समाजाबाबतील धोरणांवर भाष्य करण्यात आले आहे. भारताचे अल्पसंख्याक धोरण संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे इतर देशांसाठी एक मॉडेल म्हणून वापरले जाऊ शकते, असेही यात नमुद करण्यात आले आहे.
काय म्हणतो हा अहवाल?
भारतातील हे मॉडेल विविधतेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते.
भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संवर्धनासाठी विशेष तरतुदी आहेत. अशा तरतुदी जगातील इतर कोणत्याही राज्यघटनेत नाहीत.
भारत हा एकमेव देश आहे जिथे कोणत्याही धर्माच्या पंथांवर कोणतेही बंधन नाही.