---Advertisement---
अमळनेर जि. जळगाव : येथील पोलीस हवालदार विजय चव्हाण यांच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचे मुख्य कारण म्हणजे विजय चव्हाण यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते, ज्यामध्ये ते अडथळा ठरत होते. या प्रकरणाची गूढता ‘गुगल पे’वरील २४ रुपयांच्या पेमेंटमुळे उकलली आहे.
---Advertisement---

विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत होते आणि घनसोली येथे राहात होते. त्यांच्या पत्नी पूजाचे प्रियकर भूषण ब्राम्हणे सोबत विवाहबाह्य संबंध होते. विजय चव्हाण हे या संबंधांमध्ये अडथळा बनत होते, म्हणून पूजाने आपल्या पतीची हत्या करण्याचा कट रचला.
प्रियकर भूषण, पत्नी पूजा आणि मामेभाऊ प्रकाश यांनी मिळून या हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला. प्रकाशने विजय चव्हाण आणि त्याचा साथीदार सोमबत यांना ‘थर्टीफर्स्ट’ पार्टीसाठी आमंत्रित केले. पार्टीनंतर विजय चव्हाण आणि प्रकाश हातगाडीवर भुर्जी खाण्यास गेले. त्यानंतर, गाडीमध्ये आधीपासूनच उपस्थित असलेल्या भूषण आणि प्रवीण यांनी गळा आवळून विजय चव्हाण यांची हत्या केली.
हत्येनंतर, आरोपींनी अपघाताचा बनाव करण्यासाठी विजय चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे मार्गावर फेकला. मात्र, मोटरमनने गाडी थांबवून पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला. तपासात, विजय चव्हाण यांच्या ‘गुगल पे’वरील २४ रुपयांच्या पेमेंटचे महत्त्व समोर आले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये विजय चव्हाण आणि त्याचा मेव्हणा, जो आरोपींपैकी एक होता, एकत्र दिसले. मेव्हणाने पोलिसांना संपूर्ण घटनेचा उलगडा केला.
पोलीस तपासात विजय चव्हाण यांच्या पत्नी पूजा चव्हाण, तिचा प्रियकर भूषण ब्रह्मणे, प्रकाश चव्हाण आणि प्रवीण पनपाटील यांच्या सहभागाने हत्येचा कट रचल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.