पाचोरा : कॅन्सर या गंभीर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांच्या सर्वचप्रकारच्या मदतीसह आर्थिक मदतही देय करणारे नगरदेवळा येथील ‘आय मिस यु ग्रुप’चा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय. ‘असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे’ या उक्तीप्रमाणे नगरदेवळा येथील रहिवासी शाकीर युसूफ मदारी हे समजासाठी आदर्श ठरत आहे.
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी शाकीर युसुफ मदारी यांनी आपल्या ‘आय मीस यु’ ग्रुपच्या माध्यमातून अनोखा उपक्रम सुरू केला असून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने पीडित असलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा एक हात पुढे करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी हितचिंतकांच्या मदतीने आर्थिक सहाय्य गोळा करून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने पीडित ग्रस्तांना रोख रक्कम स्वरूपात आर्थिक मदतीसह वाटेल तीसर्वच प्रकारची मदत करण्यासाठी ते धावपळ करतात. त्यांच्या या उपक्रमाबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचे कौतुक देखील होत आहे.
नासिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सवरगांवातील नवाज शहाबुद्दीन मदारी हा तरुण कॅन्सर या गंभीर आजाराने पीडित असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ऑपरेशन करण्यास डॉक्टरांनी सांगितले असून घरची परिस्थिती ही हालाखीची असल्याने पैशांची विवंचना त्यांच्यापुढे येऊन ठेपली असतानाच नगरदेवळा येथील ‘आय मिस यु या’ ग्रुपने पुन्हा मदतीचा एक हात पुढे करत ग्रुप अध्यक्ष शाकीर युसुफ मदारी हे बुधवार, 26 जानेवारी २०२४ रोजी येवला तालुक्यातील कोपरगाव येथील कॅन्सर हॉस्पिटल येथे पोहोचत पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना ५५,५८०/- रुपयांची आर्थिक मदत रोखीने केली. या आर्थिक मदतीने कुटुंबाचे डोळे पानावले होते, तर गरजू पिढीत कुटुंबीयांच्या मदतीसाठी आमचा ग्रुप व आम्ही सदैव तयार असल्याचे शाकीर मदारी यांनी सांगितले.