नागपुरातमधील दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खासगी रुग्णलायांतून सांगितलं जातं आहे. यामध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलेय.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं सध्या ठणठणीत बरी झालेली आहेत. पण जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल, असे समोर आलेय. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याचीही माहिती. खाजगी रुग्णालयातून हे रिपोर्ट घेण्यात आले आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात शासकीय लॅबमधून याची जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल. त्यानंतरच हे रुग्ण HMPV असल्याचं स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
कोरोना नंतर HMPV व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. अशातच आता या व्हायरसने चक्क नागपूरमध्ये एन्ट्री केली असून या विषाणूचे दोन रूग्ण आढळल्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आलं आहे.
व्हायरसचा धोका टाळण्यासाठी हे करा