Nagpur News : नागपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. ईरफान अंसारी असे मृताचे नाव आहे. अंसारी यांच्यावर नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज अन्सारी यांनी अखेरचा स्वास घेतल्याचे समोर आले आहे.
नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी रात्री झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनेत अनेक जण जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, ईरफान अंसारी असे मृताचे नाव आहे.
दरम्यान, या हिंसाचारात ६० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यात ५ जण जखमी झाले असून एका घराचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणात २० दुचाकी, ४० चारचाकीचे नुकसान झाले आहे. तर २ क्रेन जाळण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत पोलिसांकडून या हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण ४६ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३६ जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी ईरफान अंसारी यांच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता, अंसारीच्या मृत्यूबाबत डॉक्टर अधिकृत घोषणा करेल. त्यांनतर आम्ही आमची बाजी मांडू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.