Najmul Hasan Shanto : नजमुल हसन शांतोने श्रीलंकेविरुद्ध झळकावले शतक

---Advertisement---

 

Najmul Hasan Shanto : बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ साठी शानदार सुरुवात केली आहे. गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावून संघाला संकटातून वाचवले आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आहे.

बांगलादेशचा संघ ४५ धावांत तीन विकेट गमावल्यानंतर संघर्ष करत होता, परंतु त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतो आणि यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमसह शानदार शतक ठोकून केवळ डाव सांभाळला नाही तर श्रीलंकेलाही बॅकफूटवर ढकलले आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (१७ जून) रोजीपासून गॉलच्या मैदानावर सुरू झाला आहे. बांगलादेशने फक्त ४५ धावांवर तीन विकेट गमावल्या. त्यानंतर शांतो आणि यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम यांनी जबाबदारी घेतली आणि हळूहळू डाव पुढे नेला. या दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या दोनशेच्या पुढे नेली. दरम्यान, शांतोने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतकही पूर्ण केले.

श्रीलंकेविरुद्ध झळकावले दुसरे शतक

श्रीलंकेविरुद्ध त्याचे दुसरे शतक आहे, तर त्याने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले आहे, तर शांतोने घरच्या मैदानावर तीन शतके झळकावली आहेत. यापैकी दोन अफगाणिस्तानविरुद्ध आणि एक न्यूझीलंडविरुद्ध केली आहे. यापूर्वी, बांगलादेशच्या कर्णधाराने २०२१ मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध १६३ धावांची खेळी खेळली होती, जी त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या सामन्यापूर्वी, शांतोने ३५ कसोटी सामन्यांमध्ये २९.०६ च्या सरासरीने १८८९ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---