शंकरशेट यांचे नाव मुंबई टर्मिनलला द्या : सोनार समाजबांधवांच्या शिष्टमंडळाची मागणी

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील सोनार समाजाच्या वतीने समाजातील विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव, सोनार हितकारणी सभा, अहीर सोनार महिला मंडळ आणि ऋणानुबंध वधू-वर पालक मेळावा समिती 2025, जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संघ यांचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन समाजातील विविध मागण्यांवर चर्चा करीत निवेदन सादर करण्यात केले. मुंबई प्रांतासह अखंड हिंदुस्थानचे शिल्पकार व महान समाजसुधारक नामदार शंकरशेट यांचे नाव मुंबई टर्मिनलला देण्यात यावे. तसेच संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजासाठी तात्काळ 3 अशासकीय सोनार समाजाचे सदस्य नियुक्त करून महामंडळाचे कार्य प्रारंभ करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष संजय बाबुराव विसपुते, सचिव संजय पगार व समस्त सुवर्णकार बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाजाच्या या मागण्यांसाठी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---