---Advertisement---
जळगाव : भारत देश नशामुक्ती (ड्रग-फ्री इंडिया) व्हावा आणि तरुणांना फिटनेस व जागरूकतेचा संदेश देण्यासाठी नमो युवा रन 2025 हा भाजयुमोचा एक राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त जळगाव येथे राबविण्यात आला.
हा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या संकल्पनेतून हा देशभर घेण्यात येत आहे. यानुसार जळगावात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा आज रविवारी (२१ सप्टेंबर) घेण्यात आली.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थित होते.
या स्पर्धेत पंच म्हणून महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांचे मार्गदर्शनात जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. विजय पाटील, डॉ. कांचन विसपुते, प्रा. इकबाल मिर्झा, प्रा. वसीम मिर्झा, प्रा. हरीश शेळके, निलेश पाटील, सचिन महाजन, योगेश सोनवणे, विजय रोकडे, विजय विसपुते, नितीन पाटील, लिलाधर बाऊस्कर, जितेंद्र फिरके, जितेंद्र सोनवणे, संजय मोती, सत्यनारायण पवार, प्रा. समीर घोडेस्वार, धीरज जावळे , अजय काशीद, डीगंबर महाजन, प्रसन्न जाधव, धीरज पाटील, रोहित सपकाळे, मयुर महाजन, रोहित पाटील यांनी काम पाहिले.