मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरात झाली. या सभेला तिन्ही पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. यावेळी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले, “मी सुरतला होतो.”
पुढे ते म्हणाले, “मला काल दिल्लीला बोलवले होते, त्यामुळे मी इथे आलो होतो. आमच्या सुरतच्या दौऱ्याचे नियोजन होते. परंतु, माध्यमांध्ये सांगण्यात आले की, माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी सभेला आलो नाही, पण माझी तब्येत चांगली आहे. माझ्यामुळे दुसऱ्या कोणाची तब्येत खराब होऊ शकते.”
“काल मी दिल्लीत असल्यामुळे सभेला अनुपस्थित होतो. सुरत हे पाकिस्तान झालय का? गुजरातच्या सीमेवर सर्वांना अडवल जातयं. या कृत्यावरुन सार काही समजत आहे.” असं पटोले यावेळी म्हणाले.