मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. नाना पटोलेच्या या विधानानंतर आता उलट सुलट राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. नाना पटोले यांनी एका मुलाखतीत हे धक्कादायक विधान केले आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
दिल्लीच्या सरकारमध्ये काय चालू आहे हे मीडियालाही माहिती आहे, पण मीडिया ते दाखवत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र पडणवीसांविरोधात काय चालू आहे हे तुम्ही दाखवता का? असं नाना पटोले म्हणाले.
त्यानंतर फडणवीसांविरोधात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना माझ्या मित्रालाच विचारा किती चाललंय त्याच्या विरोधात असे नाना पटोले म्हणाले. तो मला सांगतो मला तुम्हाला सांगता येणार नाही, तोच सांगेल असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोलेच्या या विधानानंतर आता उलट सुलट राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्याच्या राजकारणातच कट रचाला जात आहे का असा प्रश्न आता नाना पटोले यांच्या धक्कादायक दाव्यानंतर उपस्थित होत आहे.