Nandurbar : नंदुरबार येथील पार्थ शशिकांत घासकडबी याला नुकताच पुणे येथील गेली ४३ वर्षं अभिजात संगीत क्षेत्राचे जतन व संवर्धन करणाऱ्या ‘ गानवर्धन ‘ संस्थेतर्फे मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.नंदुरबारच्या संगीत क्षेत्राच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
गानवर्धन या संस्थेतर्फे अभिजात संगितावर आधारित ध्वनिफीत स्पर्धेसाठी मागविण्यात आली होती.एकूण १८ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.त्यापैकी नऊ कलाकारांची निवड करण्यात येवून त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.लवकरच हा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेतील पुरस्कार व विजेते याप्रमाणे आहेत. डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती पुरस्कार -रु.12,000 जी. सुरभी सुरेश. , पं.रोहिणी भाटे स्मृती पुरस्कार रु.10,000 , ऋतुराज कोळपे.पं.राम माटे पुरस्कार रु.10,000/-मयुरी अत्रे , दत्तात्रय धोंडोपंत रत्नपारखी पुरस्कार विभागून रु.10,000/- वैष्णवी जोशी सानिका फडके प्रत्येकी 5,000/- , रमेश बापट पुरस्कृत , विभागून-रु.10,000/- सुरंजन जायभाय हिमांशू तांबे , त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार , पार्थ घासकडबी रु. 2,500 /- , भा.वा. राडकर परिवार विशेष पुरस्कार रु 11,000 गौरी गंगाजळीवाले.
या स्पर्धेचे परीक्षण डॉ.अनुराधा पंडित. डॉ.विद्या गोखले. डॉ.राजश्री महाजन यांनी केले.तंत्रसहाय्य मुग्धा जोशी,ओजस फडके यांनी केले.पार्थच्या या यशामुळे नंदुरबारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन होत आहे.
विशेष बाब म्हणजे कांही दिवसांपूर्वीच जेष्ठ साहित्यिका डॉ.अरूणा ढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिवाचनाचा एक देखणा सोहळा संपन्न झाला.त्या कार्यक्रमाचे संचालन नंदुरबार येथील मधुरा डांगे हीने केले होते.त्यात तबलावादन ऋतुपर्ण डांगे यांनी केले तर संपूर्ण संगीत संयोजन पार्थने कले होते.