Nandurbar : नंदुरबारला 27 फेब्रूवारीला वराहपालन प्रशिक्षण : उमेश पाटील

Nandurbar : जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत वराह पालनातील रोजगाराच्या संधी व शास्त्रोक्त वराहपालनाबाबतचे प्रशिक्षणाचे 27 फेब्रूवारी  रोजी आयोजन करण्यात  आले आहे. इच्छुकांनी  पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय,नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील यांनी  केले आहे.

 

पशुसंवर्धन विभागातर्फे नुकतेच पशुपालकांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वैरण विकास आदि प्रशिक्षण घेण्यात आले.

 

या प्रशिक्षणात डॉ. आनंद चौधरी, डॉ. अजय मोळके डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. हर्षल पाटील, डॉ. विकास पाटील, डॉ. विवेक कुवर, डॉ. उमेश पाटील, डॉ. जागृती पाटील, डॉ. धैर्यशिल फडवळ, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे, आत्मा उपसंचालक उमाकांत पाटील, प्रगतशिल पशुपालक हरीश चौधरी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाबाबतही याप्रसंगी माहिती देण्यात आली असून सुशिक्षित,बेरोजगार युवकांना हे व्यवसाय सुरू करून आपली उन्नती साधावी, असेही डॉ.  पाटील यांनी  कळविले आहे.