Nandurbar : नंदूरबारला निघाली रामनामाच्या गजरात रामनाम पालखी शोभायात्रा

Nandurbar:  अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्ताने श्रीराम नाम पालखी शोभायात्रा रामनामच्या गजरात संपन्न झाली. सोमवारी सकाळी ७:३० वाजता मोठा मारुती मंदिर येथून पालखी पूजनाने सुरुवात करण्यात आली. पालखीमध्ये श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमंत यांची मूर्ती तसेच श्रीरामांची प्रतिमा पूजनासाठी ठेवण्यात आली होती.
शोभायात्रेत सर्व प्रथम धर्मध्वज, राम-सीता, लक्ष्मण यांच्या वेशभूषेतील बालक पालखीसोबत आणि  पाठीमागे सर्व रामभक्त शोभायात्रेत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप करत सहभागी झाले होते. सहभागी सर्व रामभक्त यांच्याकडून रामनामजप विलास महाराज जोशी यांनी करून घेतले. मार्गात रामभक्त यांनी रांगोळी काढून तसेच विविध चौकात पालखीचे भाविकांनी पूजन आणि फुले उधळून स्वागत केले.

शोभायात्रा श्रीमोठा मारुती मंदिर, दादा गणपती, देसाईपुरा, सिद्धिविनायक मंदिर चौक, मंगळ बाजार, राजस्थान हॉटेल, रायसिंगपुरा, अमर थिएटर, नाट्यमंदिर मार्गे श्री मोठा मारुती मंदिर या ठिकाणी शोभा यात्रेची संपन्न झाली.  प्रभू श्रीरामचंद्र यांची महाआरती हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी सपत्नीक केली.

श्रीरामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसाने श्रीरामनाम शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रा भावपूर्ण आणि आध्यात्मिकस्तरावर संपन्न होण्यासाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे नंदाताई सोनार, दीपिका कासार, राजू चौधरी, जितेंद्र राजपूत, जयेश भोई, पंकज डाबी, भूषण पाटील, सुयोग सूर्यवंशी, विजय जोशी, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत या धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.