Nandurbar : महिलासाठी बँक स्थापन करणार : खासदार डॉ. हिना गावित

Nandurbar :  बचत गट किंवा वैयक्तिक स्तरावर वस्तू उत्पादन करून त्याचे स्टॉल लावणाऱ्या तुम्ही सर्व महिला अन्य इतर सर्व महिला घटकांसाठी रोल मॉडेल आहात; अशा शब्दात बचत गटातील महिलांच्या कार्याचे कौतुक करतानाच महा संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, महिला बँकेच्या माध्यमातून यापुढे सर्व महिला बचत गटांच्या आर्थिक समस्या सोडविणे सोपे जावे, या हेतूने आगामी काळात स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक म्हणजे महिलांची बँक नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थापन करण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत.

 

अंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी सहाय्यीत महिला आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत) आणि प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, नंदुरबार अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षीमीकरण कार्यक्रम आणि वार्षिक सर्वसाधारण सभा नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आज दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित, नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल , राकेश वाणी,कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, राजेंद्र दहातोंडे, केव्हीके संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, दिनेश सूर्यवंशी, व्यवस्थापक,DIC. कांतागौरी बनकर.,वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, मविम, संदीप बछाव,ICICI, दीपक ढाकणे,MCED, विजय मोहिते,PMFME, विजय सैदाने , अल्पसंख्याक महामंडळ, दीपमाला पाटील,अध्यक्ष प्रेरणा, कौलश्या वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रारंभी या सर्व मान्यवरांनी बचत गटांनी लावलेल्या स्टाॅलला भेट दिली. खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला.

 

खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या की, मोदीजींनी तयार केलेल्या योजनेचा लाभ घेत महिला सुद्धा सक्षम होत आहेत. ज्या महिलांनी आज पीएम एफ च्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू तयार करून इथे स्टॉल लावले ते आज इतर अनेक महिलांसाठी एक उदाहरण, एक रोल मॉडेल बनल्या आहेत. तुमच्याकडे बघून बऱ्याच महिलांना या ठिकाणी प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे

 

जेव्हा आपण एखादी वस्तू बनवतो त्या विकायचा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो. फ्लिपकार्ट वगैरे सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म इथे नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. ज्याच्यावरून  वस्तू आपण विकत घेऊ शकतो किंवा ऑनलाईन त्या ठिकाणी विकू शकतो, असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवणार असून त्या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही. अशी व्यवस्था करणार आहोत, असे डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत योजनांची माहिती दिली.