Nandurbar : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने कारसेवकांचा झाला सत्कार

Nandurbar : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने कारसेवकांच्या सन्मान करण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर निर्माण करायचेच या भावनेतून आगेकूच करणाऱ्या व पोलिसांच्या लाट्या- काठ्या खाल्लेल्या कारसेवकांचे अनुभव अंगावर शहारे आणत होते.

शिवसेनेचे धुळे,नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नेहरू पुतळा परिसरातील श्रीराम मंदिरात शहरातील कारसेवकांच्या सत्कार करण्यात आला. ‘राम राम जय श्री राम’, ‘अयोध्यापती सियावर रामचंद्र की, जय’ अशा पोटतिडकीने घोषणा देणाऱ्या कारसेवकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
भगवा गमछा व अयोध्या येथील स्थापित रामलल्लांची प्रतिमा कारसेवकांना भेट देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड.राम रघुवंशी,माजी नगरसेवक किरण रघुवंशी,यशवर्धन रघुवंशी,डॉ. तुषार रघुवंशी,मेघा रघुवंशी,कल्याणी रघुवंशी यांच्यासह राम भक्त उपस्थित होते.

यांच्या झाला सन्मान 

अण्णा सुका माळी, महेंद्र पांडुरंग पाटील, मुकेश पाटील,आनंदा बाबुराव माळी, संजय नारायण माळी,राजाराम शंकर माळी,रमेश नारायण सुतार, दीपक कदम,काशिनाथ हरी तांबोळी, श्री व सौ दवे,गजेंद्र लक्ष्मण शिंपी, दिलीप शिवराम तांबोळी, पंडित रामदास भोई, प्रमोद केशव कासार, विजय भास्कर कासार, तारांचद सुकलाल चौधरी, संजय जेठे,राजेश सोनार, चंद्रशेखर रमेश कुलकर्नी, रवींद्र बोडस, रवींद्र शरदचंद्र कुलकर्णी,छोटालाल पितांबर सुतार, चंद्रशेखर दवे

कारसेवक हे प्रभू रामांचे सेवक आहेत त्यांच्या या नंदनगरीचे अभिमान आहे. कारसेवकांच्या पराक्रमामुळेच अयोध्येत मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार आपण झालो आहोत.

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी